लेखांक ६४
श्रीसदानंद गोसावी १५२६
॥ श्री स्वस्ती श्रीसके १५२६ क्रुधी सवछरे राजश्री मोकदमानी वा खोतानी वा पटेलानी परगणे कुडाळ यासी तुलजोजी वा सोनजी वा एसजी देसाई परगणे मजकूर ळहावया कारण ऐसे उपरी
गोसावीयाच्या मठासी अनछत्राकारणे गला पूर्वी आमचे वडीळानी चाळविळे ते तैसे चि आता तुह्मी चाळवीजे तुमचे थोडे ठाई
वेचते हे ठाई दीधळ्या सुक्रुत असे यासि कोन्ही काही उजूर कराळ तरी तुम्हासी आपळे वडिळाच्या सुक्रुताची आण वा सदानंद गोसावीयाची आण आसे सर्वप्रकारे अनछत्र चाळते केळे पाहिजे पूर्वीचे पत्र सकु १४6 ३ वरीखे प्लवग सवछरे लिहिले असे तैसे चाळवीचे हे विनंती
→पत्र पुढे वाचण्यासाठी इथे क्लिक करा