लेखांक ६३
१४७९ माघ शुध्द १३
स्वस्ति श्री के १४७९ पीगळ सवत्सरे माघु सुधु त्रयोदसि वारु मगळु तदीनी व्रीतीपत्र ईनाम लीहीले लीखीते चागो पाटैलु बीन ठोब्या पाटैलु मोकदम व कळसेटी बीन रामसेटी गुठाळा चौगुला व एळहो पाटैलु सुपगुडा बीन दामा पाटैलु खेळ पाटैलु बीन राघो पाटेलु नेळेकी बाबसेटी बीन एकसेटी वीमोवी आपो पाटैलु बीन पाको पाटैलु सुपगुडा हीरो पाटैलु बीन भोया पाटैलु हागवणा खुळुमसेटी बीन हरीसेटी साळोखा कोयाजी बीन आळोजी मोरीया जान पाटैलु जाधव व काळो पाटैलु सुपडा व माद सेद्यटी सेटिया व वणगो माळी मेहतरी व चागो मेहतरी साळी व समस्त मुजेरी प्रजा व बाजे मोहतर्फा व बलुते व आडाण मौजे नीब पा। वाई आत्मसुखे सदानद गोसावियाचे सेवेस व्रीतीपत्र ईनाम लीहुनु दील्हे ऐसे जे नीम चावराचा फाळा व पायपोसी व कारकुनु सारा व दमामा व उटआदा व तकदम व बाजे नकदयाती बी॥
ऐनु आवठु व साणेपाळु
व वीनेफीरी व वेसळी व गावखडी व दाणीपासोडी वा तकसीमा ११ बाद ता। ३ बी॥ दळे आबोडी फसटि बाकी तकसीमा ८ तालूके रयानी ८ बीता॥ सूत तूप नमदळोह गवत कडबी सीरडी बकरा व आर्गतनिर्गत वेठी व जेवी व बीर्हाड दीळहे असे हे पारेपार चालउनु लेकुराचा लेकरी अवलादी व अफवादी चालउनु हे सत्य यास जो चुके तो सदानद गोसाव्याचा द्रोही चद्रसूर्यो तपे तववरी रवरवी पचे हा नीमु करुनु सर्मपिले हे कायावाचा मान्य सत्य