लेखांक ५४
श्री १६२५ वैशाख वद्य १२
आज्ञापत्र राजमान्य राजश्री नीळकंठ मोरेश्वर ता। मोकदमानी व रयानी व बाजे वतनदारानी तपे मसूर व उंबरज व तारगांऊ व हमशाही गोत यास आज्ञा जे सु॥ सीत तिसैन अलफ माहादजी जगदळे व यादव या उभयतांमध्ये मसूरचे देसमुखीचा कथळा एऊन पडला आहे त्यास पूर्वी तुह्मीं ए गोष्टीचा निवडा करून साक्षपत्र जगदळियास दिल्हे ते पत्र घेऊन जगदळा हुजूर स्वामीचे सेवेसी आला येथे यादवानीं स्वामीचे सेवेसी अर्ज केला की निवाडा बरहक्क नाही जाला याउपरि उभयतांस स्थळ नेमून देऊन राजश्री अमात्यपंतास पत्र देविलिया उभयता जाऊन निवाडा करून त्यामुळे वतन ज्याचे खरेखुरे होऊन चौधा वतनदाराचे साक्षीने पत्र घेऊन स्वामीचे सेवेसी येऊन त्याउपरि ज्याचे वतन त्यास देविले पाहिजे ह्मणौन अर्ज केला त्यावरून उभयतास पाठविले असे तरी तुह्मी पाहिले कृष्णेमध्ये साक्षी दिल्ही आहे त्यास साप्रत उभयतांचा निवाडा आपले सत्य स्मरोन बरहक्क निवाडा कृष्णातीरी उभे राहून व वेताळीस स्मरोन निर्वाह करणे छ २५ शौवाल आज्ञा प्रमाण