लेखांक ५२
१६२४ ज्येष्ठ वद्य ४
(फारसी मजकूर)
मशरुल अनाम कदीमल खिजमत शामराऊ सेकदार पा। मसूर सु॥ सन १११२ मालूम दानद दरीविला माहादजी जगदळे देसमुख पा। मजकूर एउनु जाहीर केले की आपन हजूरपुरनूर जाउनु बशोर्त देसमुखी पा।मा।र देह ५७ मोबलक माझीम जाबीत पेसकस भरून फर्मान व सनद दीवान बमोहर अमीरउउमराव हासील केली अजराह इनामत पातशाह इनाम बिताा
मौजे हेळगाउ १ मौजे निगडी १
दोन मवाजात व रुसूम माझीम जाबिते बा। सनद दीवानी सेरीकरास मरहमत जाले आहेत ऐसियासी अमील पा। मा।र देह इनाम व रुसूम वगैरेस मुजाहिमत पोहचाविताती ए बाबे एदम मुजाहिमताचा परवाना व मुताबिकाची सन एनायत होय हसहुल इलतमास देसमुख मजकूर फर्मान वालाशान व दरवाजे खिजमत देसमुखी बमोहर अमीरलउमराव मनास आनउनु मुताहीमची सनद अलाहिदा भरून दिल्ही आहे व ताकीद परवाना इनाम आं कदीमल खिजमत (पुढे फाटले आहे)
तेरीख १७ माहे मोहरमु
पौा छ ७ माहे सफर सुाा १११३ सन ४७ जुलुसवाला