लेखांक ५१
१६२४ वैशाख शुध्द ११
सही
फारखती माहादजी वलद सुलतानजी जगदळे देसमुख पा। मसूर यास रतनोजी सेलार मनसबदार किलेनसीन वसतगड सु॥ सन ११११ लिहून दिधले फारखती एसी जे वसतगड फते जाला ते वख्ती आमची वस्तभाव व रुपये बाकी तुह्माकडे राहिले होते त्यास तुह्मासी दावा केला यावरी पाच जण ग्रहस्त व राजश्री साबाजी मलारी वकील राजश्री खडोजी वलद तुकोजी निंबाळकर देसमुख ता। गाजिभोयरे सा। जुन्नर व राजश्री माणकोजी रघुनाथ वकील आपले एही तुमचा लेख सुभानजी जगदळे व बहिरोजी वलद विठोजी सेठगे खेत वाडी हणवत का। मसूर याचे मारफतीने कुल खड करून दोनी से एक २०१ रुपया खंड करून लेगाड वारिले सदरहू पैके दोनी से एक रुपया आपणास पावले पेशजीचे वस्तभाव व नख्त रुपयाचे लिगाड वारिले पेशतर तुह्मासी अर्थाअथी समध नाही हे लिहिले आपले पुरवजाचे पुण्य ही लिहिली फारखती सही मूर तह सूद दर जागा जगावळी ना। खेळणा मूरतब सूद
छ ९ माहे जिल्हेज सन ४५
(१) गाही साबाजी मलारी वकील खडोजी निंबाळकर देसमुख गाजीभोयरे (शिक्का फारसी) (२) बिा कलम माणकोजी रघुनाथ वकील रतनोजी सेलार (३) अमृतराव रघुनाथ देसपाडे व गावकुळकर्णी ताा परेळी |
(४) पत्रप्रमाणे साक्ष शिवाजी नरहरी वकील अबदुल लाउस + + + (५) गोही श्रीपत गोविंद वकील यमाजी हणबोजी (६) साक्ष शिवाजी मल्हार दिवाण रा। यमाजी राजे निंबाळकर (७) गोही यशवतराऊ सावंत* (शिक्का फारसी) |