लेखांक ४८
श्रीराम १६१८ कार्तिक शुध्द १
समस्तसेनाधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री धनाजी जाधवराऊ तहा मोकदमानी व रयानी देहाय सत्तावन व खोत जकाती का। मसूर प्रा। कर्हाड
मौजे चिखली | मौजे डेरवण |
मौजे किवळ | मौजे काशीळ |
मौजे रिसवड | मौजे शिवडे |
मौजे चरेगाऊ | मौजे वडोली भिकेश्वर |
मौजे नागठाणे | मौजे खराडे |
मौजे वाघेरी | मौजे कालगाऊ |
मौजे पाचुंद | मौजे पाडळी |
मौजे शाहापूर | मौजे हेळगाऊ |
मौजे शिरवडे | मौजे नागझरी |
मौजे तासवडे | मौजे वाटार |
मौजे नाडोली | मौजे कोपर्डे खुर्द |
मौजे इंदोरी | मौजे निगडी घोलप |
मौजे वराडे | मौजे अतीत |
मौजे तारगाऊ | मौजे एणेगाऊ |
मौजे सिरगाऊ | मौजे उंबरज |
मोजे मरळी | मौजे गारवडे* |
मौजे चोरे | |
मौजे कोर्टी | |
मौजे इंदोली | |
मौजे इगनोळे | पथके जकाती |
मौजे पेरले | |
मौजे मारुल | |
मोजे मदरूळ डोणीचे | |
मौजे सांगवड | |
मौजे केर |
सु॥ सन खमस तिसैन तरफ मजकूरची देशमुखी माहादजी जगदळे याची पुरातन + + + त्यास यादव विसा गावाची देशमुखी आपली ह्मणून कथळा करीत आहेती हमशाईस सत्तावन गावीचे पाटील मिळोन कृष्णातीरी सत्य स्मरोन देसमुखी जगदळेयाची की यादवाची हे सागणे ह्मणौन तुह्मास राजश्री रामचद्रपडित अमात्य याणी आज्ञा केली त्यावरून तुह्मी सत्तावन गावीचे पाटील कृष्णातीरी उभे राहून सत्तावन गावीची देशमुखी माहादजी जगदळे याची भोगवटियाची चालत आहे यादवासी समध नाही ह्मणून महजर करून दिल्हा तो महजर मशारनिले + + + + + + + ह्मणोन विदित केले त्यावरून आज्ञापत्र तुह्मास सादर केले आहे राजश्री छत्रपतीस्वामी महादजी जगदळेवरी कृपाळू होऊन मसूरतर्फेची देसमुखी त्याचे दुमाला केली आहे गोतमुखे निर्वाह जाला आहे तरी तुह्मी देसमुखीचा हक्कलाजिमा व इनाम पुरातन चालत असेल त्याप्रमाणे माहादजी जगदळे यासी देत जाणे देशमुखीस यादवास खलेल करावया प्रयोजन नाही एविषई त्यास ताकीद केली आहे गोतमुखे निवडा महजर जाला आहे या प्रमाणे बिलाकुसूर चालणे निवाड्याप्रमाणे जो वर्तेना खलेल करील त्यास ताकीद होईल जाणिजे एविशी पंतअमात्य याची आज्ञापत्रे सादर आहेत त्याप्रमाणे वर्तणूक करणे तेरीख छ २९ रबिलोवल मोर्तब सूद