लेखांक ४७
श्री १६१८ आश्विन वद्य ५
माहाराज राजश्री छत्रपति
स्वामीचे सेवेसी
जाबसूद
सेवक धनाजी जाधवराऊ सरलस्कर कृतानेकविज्ञापना एथील क्षेम ता। छ १८ रबिलाखर परियंत सेवकाचे व ए प्रांतीचे वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामीनी आज्ञापत्रे पाठविली तेथे आज्ञा की माहादजी जगदळे यास स्वामीने कृपाळू होऊन देसमुखी दिल्ही आहे तर सुरळितपणे वतन चाले ते करणे ह्मणून आज्ञा केली आज्ञेप्रमाणे त्याचे वतनाचा मामला चाली लागला असे सांप्रत स्वामीची आज्ञा यादवाचे देशमुखीचे गाव आहेत ते यादवाचे स्वाधीन करणे ऐसी हि आज्ञा जाली असे राजश्री पंतअमात्य एही हमशाही गोत मिळऊन गोतमुखे माहाजर करून विनंतिपत्र सेवेसी लिहिले व माहाजर घेऊन माहादजी जगदळा हि आला आहे तरी स्वामीने चित्तास आणून पारपत्य करावयास स्वामी धणी आहेत माहादजी जगदळे एकनिष्ठपणे वतनदारीची सेवा करावते स्वामीने हि वृत्तीची स्थापना करून दिली आहे हाली मशारनिले सेवेसी विनंति करितां विदित होईल सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति