लेखांक ४६
श्रीराम १६१८ वैशाख वद्य १२
राजश्री तिमाजी यमाजी + + + + +
व कारकून प्रा। सातारा गोसावी यासि
॥ अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री केदारजी सुरवौसी सरनौबत सरकार रा। मुरारजी घोरपडे वजारतमाब दंडवत सुहुरसन सीत तिसैन अलफ रा। पतअमात्य यानी माहलीचे कारकून बैसउनु पाटिलांस कृष्णेमधे घालून रा। माहादजी देसाई याचे कागदपत्र करून दिल्हे होते कागद ९ तुमचे बखेर घेउनु हुजूर रा। स्वामीजवळी आले होते एथे गिरजोजी यादव यानी कटकट केली होती त्यास रा। हिंदूरायानी नाना प्रकारे माहादजी देसाई याचे अभिमान धरून कागदपत्र करून पाठविले असे एथे च कागदपत्र करून देत होतो त्यास गिरजोजी यादव ह्मणो लागले ते मागुती जाउनु तेथे निवाड करून घेऊ ह्मणउनु विनति केली त्यावरून उभयतास हि तुह्माकडे पाठविले असे जे पाटील कृष्णेमधे निघोन निवाडा करून दिल्हे होते ते च आणून मागुती एकदा निवाडा करून देणे पहिलियाने एकदा कृष्णेमधे निघोन एक सागितले दुसरेयाने दुसरे सांगितले याने त्याचे मुलाहिजा कोणी करणार नाही ज्याचे अभिमान रा। हिंदूरायानी धरिले असतील त्याचे व्रित्तीस नास होईल हे तो गोष्टी कालत्रई घडणार कळले पाहिजे तुह्मी देसाइयाचे जैसे जैसे चालवाल तैसे तैसे रा। रामाची कृपा तुह्मावरी विशेष होईल कळलें पाहिजे जाणिजे छ २५ माहे सौवाल