लेखांक ४५
श्री १६१७ ज्येष्ठ वद्य ६
जाब सूद
माहाराज राजश्री छत्रपती
स्वामीचे सेवेसी
सेवक आज्ञाधारक संताजी घोरपडे सेनापती जफ्तन-मुलूख व लेखक कृतानेक विज्ञापना विनंति स्वामीचे कृपाद्रिष्टीकडून ता। छ १९ सौवाल मुकाम कटापूर सा। कोरेगाऊ परयंत वर्तमान सेवकाचे व सेनेचे यथास्थित असे विशेष रा। माहादजी जगदळे हे स्वामीचे सेवेसी पूर्वी आले होते त्यावरून महाराज कृपाळू होऊन मसूर तर्फेची देशमुखी करार करून आज्ञा दिल्ही त्यावरून देशास येऊन वतनाची लावणी सांचणी करून स्वामीकार्य करीत होते त्यास सांप्रत पदाजी यादव व आणिखी त्याचे भाऊबंद यास देसमुखीच्या सनदा दिल्या ते देशास येऊन खटपट करितात यावरून वतनाचा व मुलुकाचा डोहणा होतो साप्रत माहादजी जगदळे स्वामीचे पायापासी आले आहेत पुर्वीपासून स्वामीच्या राज्यांत एकनिष्ठपणे सेवा केली स्वामी दयाळू होऊन देशमुखी करार केली त्याप्रमाणे यादव यास मागती पत्र करून दिल्हे पाहिजे दया पूर्ण केली पाहिजे