लेखांक ४१
१६१६ मार्गशीर्ष शुध्द ९
माहाराज राजश्री छत्रपती
स्वामीचे सेवेसी
आज्ञाधारक सेवेसी सेवक मोरो रायाजी पापत्यगार ता। मसूर व उंबरज विज्ञाप्ति सु॥ खमस तिसैन अलफ छ ७ माहे रबिलाखर स्वामीचे कृपादृष्टीकरून सेवकाचे व माहालीचे वर्तमान यथास्थित असे द॥ माहादजी जगदळा देसमुख ता। मसूर स्वामिसनिध चंदीप्रांते येऊनू स्वामीचे आज्ञापत्र राजश्री पतअमात्य यास सादर जाहाले तेथे आज्ञा की माहादजी जगदष्ळा देसमुख ता। मसूर देह ५७ याची करीना हमशाही गोत मिळवून करीना पाहून दुमाला करणे ह्मणऊन आज्ञा आज्ञेप्रमाणे अमात्य एही माहालीच्या कारकुनास आज्ञा केली आज्ञेप्रमाणे तरफमजकूरीचे पाटीलकुलकर्णी उबरजेचे सगमी समस्त गोत व हमशाही माहालीचे मिळोन कृष्णेमधे उभे राहून आपले इमानपूर्वक बेताळीस स्मरोन सागितले की जगदळियांची देसमुखी खरी व यादव लटिके त्यावरून साक्षपत्र जाहाले त्यावरी तमाम देसक व पाटील एही आपली निशाने करून दिल्ही राजश्री अमात्य व राजश्री पंतसचिव व राजश्री सताजी घोरपडे सेनापती व राजश्री जाधवराऊ सरलस्कर एही पत्रे दिल्ही देसमुखी दुमाला केला देसमुखी करीत असता गिरजोजी यादव एही स्वामीचे पत्र व आपले पत्र ऐसे पत अमात्य यास सादर जाहाले त्यावरून पुन्हा याचे वृत्तीस अतर जाहाले माहादजी जगदळा देसमुख ता। मसूरास आला तव सुभेदार पा। सातारा स्वारीस या प्राते आले गावगन्ना पाटील तामाम मिळाले होते त्यास पुसोन मनास सुभेदारी आणिले तव रुद्राजी चंदो देसकुळकर्णी व तमाम मोकदम व पाटील व कुळकर्णी यानी साक्ष दिल्ही जे माहादजी जगदळा देसमुख देहाय ५७ खरा यादव लटिके ऐसी साक्ष दिल्ही व पुरातन पत्रे पाहिली जगदळियाची देसमुखी हे स्वामीचे सेवेसी विनतिपत्र लेहून दिल्हे स्वामी अवतारी त्या अवतारे बिभीषणाची स्थापना जाहाली तो चिरजीव जाहाला तो च हा अवतार दुष्टाचा सव्हार धर्माची स्थापना होत आहे पूर्वी हि वृत्तीवर याची स्थापना स्वामीनी केली ते अनेथा होणार नाही माहादजी जगदळा देसमुख ता। मा।र खरा ऐसी साक्ष आहे त्याहिवरी देश याने लाविला स्वामीच्या पायासी एकनिष्ट दुसरा पदार्थ जाणत नाही कृपाळु होऊन स्थापना करणार स्वामी समर्थ आहेती जाहाले वर्तमान सेवेसी लिहिले सेवेसी श्रुत होय हे विनंति *