लेखांक ४०
श्रीशंकर १६१६ कार्तिक शुध्द ७
राजश्री भानजी गोपाळ सरसुभेदार
व कारकून प्रा। कर्हाड गोसावी यांसी
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नेहांकित संताजी घोरपडे सेनापती जफ्तनमुलूक दंडवत सु॥ खमस तिसैन अलफ विशेश यादवामधे व माहादजी जगदळे या उभयतांमधें मसूरचे देशमुखीचा गर्गशा आहे त्याकारणे रा। पंतअमात्य यानी माहालच्या कारकुनास लिहिले होते की हमशाही गोत पाटील मेळऊन कृष्णेमधे उभे करून बरहक्क असेल ते करणे त्यावरून माहालकरी यानी रा। पंताचे लिहिल्याप्रमाणे निर्वाह केला आहे याउपर रा। पंत तुह्मांस लिहितील तेणेंप्रमाणें वर्तणूक केली पाहिजे बहुत काय लिहिणे कृपा असो दीजे रा। छ ५ रबिलोवल हे विनंति