लेखांक ३९
श्री १६१६ कार्तिक शुध्द ७
माहाराज राजश्री छत्रपति
स्वामिचे सेवेसी
सेवक सताजी घोरपडे सेनापति व लेखक कृतानेक सेवेसी विज्ञापना विनति एथील वर्तमान ता। छ ५ रबिलोवल मु।। सातारा स्वामीच्या कृपादृष्टीकरून सेवकाचे व लस्कराचे वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामीचे आज्ञापत्र छ २४ साबानचे सादर ते छ ६ जिलकादी प्रविष्ट जाहाले तेथे आज्ञा की रा। माहादजी जगदळे देशमुख ता। मसूर हे हुजूर येऊन तेथे आज्ञा की रा। मजकूरची देशमुखी आपली कदीम पुरातन आहे त्यास साप्रत आपला भोगवटा उठला आहे तर स्वामी कृपाळू होऊनु आपली देशमुखी आपल्या स्वाधीन केली पाहिजे ह्मणौउनु त्याजवरून मशारनिलेच्या देशमुखीचे फर्मान बेदरपातशाहाचे व इदलशाही पातशाहीचे मनास आणून त्या प्रातीचे वतनदार हमशाई गावीचे याप्रो। स्वामीसनिध आहेत त्याणी याची देशमुखी पुरातन आहे ऐसी साक्ष दिली त्यावरून तर्फ मजकूरची देशमुखी याचे दुमाला केली आहे तुह्मी याची हरबाबे मदत करून याची देशमुखी याचे दुमाला करून चालवीत जाणे ह्मणौउनु आज्ञा आज्ञेप्रमाणे राजश्री रामचद्रपत अमात्य व आह्मी पुन्हा मागती कागदपत्र मनास आणून ता। मजकूरची देशमुखी मशारनिलेच्या दुमाला केली आहे स्वामीच्या आज्ञेप्रमाणे चालऊन हक्कजवार हमशाई गावीच्या मोकदमानी गोतपत्र करून दिल्हे आहे माहादजीचे वतन पुरातन आहे हे आह्मी हक्कजवारीच्या गुतीमुळे व कागदपत्रामुळे चौकस मनास आणून दुमाला केले असे तरी स्वामीने याचा पुत्रपौत्री याची देशमुखी तर्फमजकूरची चालवावया स्वामी धणी आहेत माहादजीने स्वामीच्या पायाशी बहुत च एकनिष्ठेने वर्तणूक केली आहे पुढे हि यापासून अतर पडणार नाही यासी कितेक लोक सुष्ट दुष्ट आहेत स्वामीपासी काही विपरीत करून सागतील त्यावरून स्वामीस प्रमाण वाटेल याच्या वृत्तीस मामलियात दुष्ट बहुत च आहेत हर कोणी सागतील ते स्वामीने मनावर न घेतले पाहिजे *ए विसीचे वृत्त राजश्री रामचद्र अमात्य एही सेवेसी लिहिले आहे त्यावरून विदित होईल सेवेसी श्रुत होय.