लेखांक ३८
श्री १६१६ भाद्रपद शुध्द १
बखेर सेवेसी सेवक मोरो जनार्दन कारकून ता। उंबरज व मसूर साहेबासी विनति सु॥ खमस तिसैन अलफ ता। छ माहे
स्वामीच्या कृपादृष्टीकरून सेवकाचे वर्तमान व माहालीचे वर्तमान यथास्थित असे विशेष स्वामीचे आज्ञापत्र सादर जाहाले छ २१ जिल्हेज पो। छ २९ मिनहू येथे आज्ञा की मा। माहादजी जगदळे देसमुख ता। मसूर याचे देसमुखीवरी यादव उभे राहिले आहेती तरी तुह्मी तरफमजकुरीचे गावगन्ना वतनदार पाटीलकुलकर्णी चौगले मोख्तसर बोलाऊन आणून श्रीकृष्णातीरी जमा करून त्यासी शफत घालून विचारणे ते सागतील ते करीना हुजूर लेहून पाठवणे ह्मणौन आज्ञाप्रमाणे ता। मजकूरीचे पाटील कुळकर्णी चौगले व सेटेमाहाजन व बारा बलूते मोख्तसर बोलाऊन आणून थळ कसबे उबरज तेथे श्रीकृष्णासगमी छ १७ मिनहू बुधवारी पाटील कुलकर्णी चौगले मोख्तसर ऐसे कृष्णेमधे घालून त्याचे माथा शफत घालून विचारिले की राजश्री पतअमात्य स्वामीनी आह्मास आज्ञापत्र सादर केले आहे की माहादजी जगदळे देसमुख याचे देसमुखीवरी यादव उभे राहिले आहेती तरी तुह्मी गावगावीचे पाटील कुलकर्णी चौगले कृष्णातीरी मिळऊन त्यास शफत घालून विचारणे ह्मणौन आज्ञा आहे तरी तुह्मी श्रीकृष्णेत उभे राहून आपले पूर्वज स्मरोन तुह्मास ठावके असेल अगर तुमचे वडिलानी सागितले असेल ते सत्यपूर्वक सागणे त्यावरी तरफमजकुरी पाटील कुलकर्णी चौगले यानी आपले माथा शफथ घेऊन आपले पूर्वज स्मरोन श्रीकृष्णेस रिघोन सागितले की माहादजी बिन सुलतानजी (पुढे फाटले)