लेखांक ३७
श्री १६१६ भाद्रपद शुध्द १
राजश्री हवालदार व कारकून ता। मसूर व तारगाऊ
साहेबाचे सेवेसी
-॥ अर्दास शेरीकर मोकदमानी मौजे पाडळी भिवजी पटेल व जानोजी पटेल व गोपाळ त्रिमळ कुळकरणी मौजेमजकूर व ता। तसागाऊ सु॥ खमस तिसैन अलफ इ॥ ता। छ माहे जिल्हेज पावेतो साहेबाचे नेक नेजरेकडून शेरीकराची बखेर सलायत असे
माहे जिल्हेज रा। माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख ता। मसूर याची देसमुखी राजश्री साहेबानी बुनादी कागद पत्र व फर्मान पाहून करार करून दुमाला केली ऐसियास यादवानी कथळा केला आहे तरी यादवानी कथळा करावयास गरज नाही आमचे वडिलानी जगदळियाची देशमुखी बुनादी सागितली आहे यावरून जगदळियासि आह्मी माहजर करून दिल्हा आहे आपले वडिलाचे वडील यानी देसमुखी जगदळियाची ऐसे सागितले आहे हे गोष्ट खरी आहे यासि बखेर लेहून देणें हे अर्दास