लेखांक ३६
श्री १६१६ श्रावण वद्य ४
माहाराज राजश्री साहेबाचे
सेवेसी
विनंति सेवक चांदजीराऊ पाटणकर देसमुख प्रा। दत-गीर पाठण सेवेसी प्रार्थना विनति उपरि सेवकाचे वर्तमान तरी ता। छ १७ जिल्हेज सन खमस तिसैन अलफ पावे तो स्वामीचे कृपादृष्टीकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे
राजश्री माहादजी बिन सुलतानजी जगदळे देसमुख ता। मसूर यात व यादवात देसमुखीचा गर्गशा लागला आहे ऐसियासि पूर्वी वडिलाचे वडील सागत आले आहेत की जगदळियाची देसमुखी आहे एविसी हक्कजवारीचे माहाजर आहेत व पाताशाई फर्मान आहेत ते साहेबी मनास आणून देसमुखी दुमाला केली आहे मागती या प्राती कोणी यादवाची पाठी राखोन यासि कटकट करिताती तरी स्वामीने हक्कजवारीचे माहाजर मनास आणून याचे वतन याचे दुमाला करणार स्वामी धणी आहेत परतु देसमुखी जगदळियाची खरी आहे हे वर्तमान वडिलाचे वडिली सागितले आहे व सेवकास विदित आहे साहेबी यादवास पत्रे दिल्ही आहेत की उबरज तरफ व तारगाऊ तरफ येथील देसमुखी यादवाची ह्मणऊन पत्रे दिल्ही आहेत ऐसियासि उबरज व तारगाऊ या तरफा कदीम नव्हते मसूर तरफ कदीम आहे अलीकडे या राज्यात कबजगिरी आधी जाली ते गावी ठाणे बैसऊन तरफा केलिया आहेत सेवेसी श्रुत होत हे विनंति