लेखांक ११
श्री १६०६ माघ शुध्द ७
१/५
पांच बंद रास
स्वस्ति श्रीराज्याभिशेक शके ११ रक्ताक्षीनामसंवत्सरे माघ शुध सप्तमी मदवासर सभा विदमान
कारणे जाला निवाडा ऐसा जे माहादजी पा। जगदळा कसबे मसूर ता। उबरज व सताजी पा। घाडगा मौजे सिवडे व मौजे वराडे ता। मा।र यामधे व सितोजी व सटवोजी भोसले यामधे कसबे मसूर व मौजे कोणेगव्हाण व मौजे सिरवडे व मौजे सिवडे व मौजे वराडे ता। मा।र या गावीची सितोजी व सटवोजी भोसले एही धामधूम करून सेतेभाते हिरोन घेतली व आणीक हि कितेक आवाडाव केली याच्या कलमाचे कलम राजश्री कविकलश छदोगामात्य व राजश्री सरकारकून एही सदरेस बैसोन निर्वाह केला बितपसील