लेखांक ६
श्री १५३२ माघ शुध्द १०
तालीक
॥ श्रीगणेशायनम ॥
॥ श्रीसरस्वत्यैनम ॥
॥ श्रीसिध्देश्वर साक्ष ॥
॥ श्रीगोदावरी साक्ष ॥
बिहुजूर दावलखान
हवालदार
महजर स्वस्ति श्री शके १५३२ वर्षे सौम्यसवस्तरे माघशुध दसमी सोमवार तद्दिनीं जाहाला माहाजर स्थल कसबे प्रतिष्ठान गोदावरीसन्निध वेव्हारप्रवीण धर्माधिकारिणी हरीपाठक व माणिकपाठक यानी निर्णय महजर केला ऐसा जे, अग्रवादी नरसोजी जगदळे देशमुख तपे मसूर व पाटील कसबेमजकूर परगणे कर्हाड व पश्चमवादी बापाजी बिन याकुबजी मुसुलमान सेकीन या उभयतामध्ये कसबे मसूरचे पटेलगीचा गर्गशा देणियाबद्दल लागला होता याबद्दल इदलशाही विलायतीमध्ये यकदोन थळे केली व हजूर हि पादशाहा जगद्गुरू यानी मनास आणून फर्मान करून दिल्हा व हजरत आल्ली पातशाही विजयापुरी होते त्याचा फर्मान व बरीदपादशाहा याचे फर्मान ऐसे व थलीचे कागद ऐसे मलिकीनीस दिवाणअल्ला याचे पत्र ऐसे लाखोटे करून बराबरी दावलभाई माहालदार देऊन व हवालदार दावलखान यास मलिकिनिंस दिवाणआला याचे पत्र ऐसे लाखोटे होते की उभयतास कसबे श्मसूरीचे पटेलकीसमधे गर्गशा आहे की बापाजी मुसुलमान याने अर्ज केला की आपणास दूरस्थळास पाठविणे, परस्थली निवाडा होईल त्यास आपण राजी, हक्कजवारीचा निवाडा जो जाहाला तेथे जगदलेयाची पाठी राखताति, आपल्यास दूरस्थल दिल्हे ह्मणजे तेथे निवाडा होईल त्यास आपण राजी मग याकरिता उभयतास तुमच्या स्थलास पाठविले आहे ये प्राती निवाडे जाहाले व पुराणे कागदव फर्मान व निवाडेयाचे महजर जगदळेयापासी होते ते हुजूर मनास आणून उभयताचा निवाडा येथे च करावा परतु बापाजी मुसुलमान याणे थळ मागितले याकरिता मोहिबाचे थळे दिल्हे आहे प्रतिष्ठान थोर जागा आहे हमेषा निवाडे होताआहेत न्यायनीति बरी होते याजस्तव उभयतास तुह्माजवळी पाठविले आहे ऐसे पत्र