लेखांक ५
श्री
नवाब बहादूरखान
साहेब
सौा ताईजी व अनसाव व मानावा व साखराम यास प्रती क्षेम आलिगण रामराम विनति येथील क्षेम ता। २२ रजब तुह्मी आपले क्षेम लिहित जाणे विशेश तुह्मी पत्र पाठविले पावोन वर्तमान कळो आले तुह्मी लिहिले होते त्यास आजी तागाईत दर करनाटकात होतो हाली नजदीक आलो असो तुमचे कामास अर्ज करून फैसल देऊ काही फिकिर न करणे तुह्मी खातिरजमा असणे एथे आलियावर हिदळेचा लावासा जाहाला आहे, याकरिता यास जबाब देऊन पाठविले आहे मोकरर ठिकाणी जालियावर तुमचे काम होईल काही चिता न करणे तुमचे भेटीची अपेक्षा आहे तर एकदाचे भेटी घेणे बहुत काय लिहिणे हे विनति