लेखांक ४
१ बएस तहरीर सीतूर आ की बतारीख ६ + + + + + + + +
२ वाला आ की छ मजकुरी पहिल्याया बारा बो। + + + + + + + +
३ व सुलतान माने व सकरा यादव बिरादर + + + + + + + + + + + +
४ पा। कराडाबाद व मल्हारी थोरात वगैरे + + + + + + + + + +
५ हजार स्वार व पाचशे प्यादे बारकदाज ठाणे म + + + + + +
६ हरामखोर घेउनु जात होते यावरी जमालखान व सी + + + + + +
७ दस्तगाह कृष्णराऊ ठाणेदार व सुभानजी वाग + + + + + + +
८ देसमुखाचे फरजद बजमीयतीने बाहीर निघाले ए + + + + +
९ सी मुकाबिला केला लढाई करारवालाई जाली ज + + + + +
१० थोडी होती याबद्दल पाहाडीचा आसरा धरून जगला तेथे
११ गनीमाही दोन फौजा केल्या एक फौज नाइखा वगैरे कडे पाहाडीस घेरा
१२ घातला व दुसरी फौज कसबेमजकुरावरी एउनु करू लागली
१३ त्यावरी माहादजी देसमुख कसबियाबाहीर एउनु लडाईत + + +
१४ व गोळी व शमशेर ऐसी जग केली यावरी मुफसदाही सी + +
१५ खाउनु निघाले आनी दोन्ही फौजा एका ठाई होउनु + + +
१६ गीर्द बगीर्द घेरा घातला आनी लडाई थोर जाहाली + + + +
१७ गनीमाकडील मल्हार थोरात नासारदार जिवे च मारिला व कितेक
१८ गनीमाकडील लोक जाया जाले, जखमी जाले व मारले गेले सकाळ +
१९ पासून तो तिसरे पाहर पावेतो जग करारवालाई जाली यावरी
२० सुभानजी व सभाजी पिसर माहादजी देसमुख यासि
२१ गोळीची व भाले व तरवारचेया जखमा लागल्या होत्या कामास
२२ आले व कितेक स्वार बिरादरीचे व प्यादे बरकदाज मारले गेले व कितेक
२३ जखमी जाले यावरी जमाल महमद व सीवराई नायबाने थानेदारमजकूर
२४ व एसोजी व शामजी पिसराने माहादजी देसमुख पाडाऊ जाले यावरी
२५ फौज नासरदार तेथून स्वार होउनु कसबेमजकुरानजीक एउनु राहिले
२६ दुसरे रोजी नासरदाराही ठाणे खाली देखोन कसद ठाणी घे-
२७ याचा केला तयार जाले त्यावरी माहादजी देसमुखे विचार केला की
२८ ठाणे पातशाही हातीचे जाते आपल्या लेकाच्या लोथावरी
२९ पाय देउनु, ठाणी बाहीर एउनु लडाई करारवालाई केली अज एकबल
३० पातशाही मुफसद नासरदार यासि तबी केले (करारवालाई केली) यावरी नासर-
३१ दार रुयेशा होउनु कराडाबादेकडे कुच जाले ठाणेमधे सुभान
३२ बिरादर सरूप व कृष्णा पिसर पदा देसमुख कराडाबाद
३३ मुफसदाजवळी एउनु भेटले व करू यादव नासरदार याचा
३४ भाऊ यासी सागाता घेउनु, कराडाबादेस घेउनु गेले आपल्या
३५ घरास नेउनु मेजवानी दिली यावरी सरूप व पदाजी देसमुख
३६ याचे लेक नासरदारासी मसलत केली माहादजीचे
(अपूर्ण)