Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ५६
श्री.
आपत्यें माधवरायानें चरणावरीं मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील क्षेम ता। छ २९ जिल्हेज मु।। नजीक कनगिरी येथें वडिलांचे आशिर्वादेंकरून सुखरूप असों विशेष वडिलांचे सेवेसीं इकडील वर्तमान लिहून पूर्वी सेवेसीं पत्रें पाठविलीं आहेत त्यावरून विदित जालें च असेल सारांश मजला आपण वडील असतां दौलतेची व कर्जाची व नांवलवकिकाची किमपि चिंता वाटत नाहीं वडील जें करणें तें करितील च ऐसें मानून निश्चित आहें नाहीं तरी सरदार डोईजड व पत कोठें च राहिली नाहीं कोण्हासी चाकरी करितां नेट धरून बोललियास वडिलास विपरीत प्रदर्शन करून तत्काल च घरांत पेंच पाडून राहिली ती ही दौलत बुडवायास सिद्ध च आहेत व शत्रू प्रबल आणि साहित्य याप्रमाणें आहे परंतु सर्व पेचांत आली दौलत इचा बंदोबस्त करणार वडील समर्थ आहेत कांहीं चिंता नाहीं आम्हीं आज्ञेप्रमाणें वर्तावें सेवा करावी यांत च इहलोक परलोक आहे पुढें वडिलास जसें कर्तव्य असेल त्याप्रमाणें सूचना लिहिली म्हणजे त्या च लक्षानें चालेन दौलतेचा बंदोबस्त केला म्हणजे यांत च सर्व स्नानसंध्याचें फल आहे ऐसें मर्यादा सोडून लिहिलें म्हणून वाईट न मानिलें पाहिजे हें पत्र दुस-यास न कळे तें केलें पाहिजे सेवेसी विदित होय हे विज्ञापना