Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
पत्रांक ५२
श्रीशंकर
राजश्री तात्यास नमस्कार
विनंति उपरि फार विस्तार न रुचे तुम्हांस विनंति करण्यास सोई न पडे खावंदास कृपाकरून एक बंदभर मजकूर श्रवण करावयास अनुकूळ न पडे तर उत्तर तैसें च पा। याजवरून च उमेदीची परीक्षा समजावी आम्हांस लौकिकांत लज्या आमचे नि।। बहुळा किल्ला होता ते। रा। लक्षुमणपंताकडे त्या प्रकारें आम्हाकडे असल्यास श्रीमंतांस भरवंसा पुरे ना म्हणून श्रीमंत कृपा करून आमचा आम्हांकडे देत नाहींत इत्यादिक दुलौकिक लौकिकांत खालीं लोकांत पाहावेंसें होतें जशी निशा पा। तशी जाली च असेल आणि पुढें हि पडेल एक श्रीमंतांचे च जालों असें जाणोन कितेक हे लहान च गोष्टीचे दुलौंकिक दूर करावे उमेद जाल्यानें सेवकापासून लाखो रुपयांची कामें सरकारनफ्याचीं होऊन येतील यख्तियारी करण्याची आणि सांगितलें प्रमाण मानून खावंदानें ती गोष्ट आयकून त्याप्रकारें करणें इतकें जाल्यानें चाकरलोकांस आव येऊन सेवकाचे च हातून सरकारनफा सहजांत होऊन येतो मागें गोष्टी आल्या व पुढें हि उमेद राखोन करविल्या तर तशा च घडतील वरकड फार एव्हां न होय तर किल्ला सरंजामसुद्धां आमचे नि।। तूर्त द्यावा लौकिकात कृपा केलीशी दिसेल तूर्त घोड्यास कुरणामुळें वैरणकाडी मिळेल पुढें कृपा विशेष करणें ते श्रीमंत च करतील न म्हणावें न बोलावें तर मुक्याचा जाण या कालीं कोण होतो यास्तव विनंति करविणें प्राप्त जाली म्हणून तुम्हांस खोलून लिहिलें तर दोही मजकुराचे उत्तर साफ पाठवणें कृपा करणार असले लिहिल्याप्रकारें होऊन कांहीं तरी दोही प्रकारांतून एक प्रकार तरी घडत असला तर तुम्हीं आन्या जाल्यास लिहिणें मी च त्रिंबकेश्वरी येऊन कृपेस पात्र होईन नाही तर साफ उत्तर तैसें च पाठविणे हे विनंति