पत्रांक ८१
श्री
पु।। विनंति उपरि बनिया देता नहि पुरा तोल अशी गोष्ट आम्हीं लिहिली की मी थोडेसें जानूबरोबर सांगोन पाठविलें म्हणून तपशिलें लिहिलें नाहीं तर प्रयोजन नाहीं खासगी सरंजाम आबाचा त्याचा प्रकार कलमबंदीनें लिहिला आहे त्यास देवळाचे कुसाचें काम जाहालियावर कसर राहूं लागली तरि सरकारची च आहे अंतर कोण करील जें आहे तें खावंदाचें आहे परंतु चाकरी स्वच्छतेनें घेतली तरी सर्व हि द्यानतदारीनें होईल आम्हांस न सागावें हरी गोपाळ बरे सकार बरे हें च ध्यानांत खावंदाचे भरलें असलें तरीं बहुत उत्तम आम्हांस प्रयोजन नाहीं आमच्या मुलाचें कपाळ त्याचें त्याजबराबर दुस-यानें कारभार करावा आपण पाहावें आणि पुढील आषा धरावीं हें अयोग्य आम्हांस काहीं आशा नाहीं एक मान पाहिजे त्यास चिरंजिवाचे हातें काम घेतील तरी रदबदी व सर्व करून दाखऊं नाहीं तर काहीं नलगे खातरेस येईल तें करोत या पत्राचें उत्तर पाठवणें श्रीमंताशीं एकांती बोलणें असें असेल तर खोलून बोलणें जर निव्वळ मर्जी चांगली आढळली तरीं हीं पत्रें दाखविलीं तरी चिंता नाहीं मग चिंता काय आहे परंतु खावंदानी आमचामात्र आशय घ्यावा पत्रे पाहावी आणि मग चितांस येईल तें करावें असें मात्र आम्हासीं नसावें तुम्हास पुर्ते दृढ कळलें तरी पत्रें दाखवणे नाहींतर काम नाहीं सारांश पथकाचा सरंजाम सर्व कढून हजुर ठेवावा पागेस मात्र सरंजाम देऊन चाकरी घ्यावी खासगी सरंजामांत संसार खर्च देवणे व + + करवावें यांत कसर राहील ती सरकारची चाकरी चिरंजिवाजवळून घ्यावी हें मनांत आहे जाहालें तरी असें व्हावें न होय तरी खातरेस येईल तें करोत कांहीं नलगे हे विनंति