पत्रांक ७६
पो छ १ जिल्हेज श्री
राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोप्य त्रिंबक सदाशिव कृतानेक नमस्कार व गोपाळराव गोविंद कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन केलें पा। विशेष तुम्हांकडे आम्हीं पत्रें सरकारच्या खिजमतगाराबराबर व जासुदाबरोबर पांच सात सविस्तर मा। लिहून पाठविलीं ती पावली कीं नाहीं कळत नाहीं किंवा मध्यें च कोणी दंगा करितात हें कळत नाहीं तरी सविस्तर लिहिणे तुमचीं तीनचार पत्रें पावलीं इकडील वर्तमान तर तुमचा कारकून रामाजीपंत पागेवर होता तो दारूनें जळाला होता पहिले तुम्हांस लिहिलें च होतें त्यास उपाय केला परंतु देवाज्ञा जाहाली चौघे बारगीर दारूनें जळाले आहेत बरे होतील बोर घोडा इकडील आजारानें तुमचे पागेतील मेला वरकड बरीं च आहेत पागेंत जयरामपंत आहेत कळावें हैदरनाईक मायनहळ्ळीपाशी झाडींत आहे. श्रीमंत मासुरापाठीमागें आहेत साता कोसाची तफावत आहे दोन बा-या मध्यें आहेत अवघड जागा जाऊन राहिला आहे आतां पुढें कसें होईल पाहावें छावणी करावी असा मनसबा घाटीत आहेत पाहावें काय होईल तें हैदरनाईक चालून येऊन जुजत नाहीं त्याच्यानें येवत नाहीं असें आहे आम्हांकडील वर्तमान यथापूर्व आहे कर्ज घेऊन खाऊन आहों तुम्हांकडील वर्तमान सविस्तर लिहीत जावें छावणी जाहाली तरी चिरंजीव बजूस सासवडास पाठऊन देऊं आम्हांस राहाणे जाहालें च दादा स्वामी तिकडे च राहाणार किंवा पुण्यास येणार बाई राहाणार किंवा येणार हें लिहिलें पाहिजे रा।। वैशाख वद्य सप्तमी मुाा मार लोभ असो दीजे हे विनंति
स्रो खंडोजी व सखोजी जगथाप रामराम