पत्रांक ७३
श्री
सेवेसीं हरी बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति ता। छ ३० रजब मु।। नजीक गुडगुटें कृष्णा उत्तरतीर वर्तमान यथास्थित असे विशेष राजश्री बाबूजीनाईक यांजकडील यादवराव याजपासून पांच हजार नजर घेतली तो पैका माघारी देण्याविशीं श्रीमंतांनीं पत्र राजश्री नानाफडणीस यांचे नावें लिहून दिल्हें तें मजजवळ राहिलें होतें तें आपणाकडे पाठवीत असें घ्यावें उत्तर पाठवावें कृपा केली पाहिजे हे विनंति.*