पत्रांक ६८
श्रीशंकर
राजश्री तात्या स्वामीचे सेवेसीं
विनंति उपरि तुम्हीं लिहिला मजकूर सर्व कळला त्याविशींचा शोध लि।। स्थळीं केला त्यास तेथील लडा पडत च नाहीं ऐसें च उभयतांचे सांगण्यांत कळूं आलें परस्परें नकळतां निरनिराळा शोध केला केल्या कर्माचा वसवास पुढें खावंदांचे च पदरीं असोन परिणाम लागावा याविशीं आस्वासन दोन्ही मजकूर उल्लेख लिहिण्यांत येऊन स्वस्ताक्षरें चिटी समस्तास त्या च अन्वयें बकारपूर्वक सरनाइकासमात्र लौकर गेली तर या च पत्रावरून खामखा येतात काडीचा संदेह नाहीं ऐशी निशा आकारपूर्वक बकारपूर्वकाचा पुत्र आहे तो पुरवितो आमचे मतें जर खरेंखुरें मनापासून आहे तर उशीर केल्यास कार्यनाश संदेह फिटल्याखेरीज यावयास भयधरून येत नाहीं ते गरीब म्हणून संशय मानितात श्रीमंतांस करणें त्यापक्षीं इतके लांबणीवर न च टाकितां दोघांस लि।। अन्वर्थे निखालस खोलून दोन्ही चिठ्या स्वस्ताक्षरें द्याव्या श्रीमंताचे चित्तानरूप निश्चयपूर्वक कार्य होऊन येतें महद लाभ आणि लगामी हे प्रकार घडतात उगे च बलाविलें तर संदेहानें संदेह होऊन एवढा लाभ हातचा जातो या गोष्टीविशीं जशी पा। तशी निशा करून दोन्ही चिट्या मात्र घेऊन पा। बारा पंधरा दिवसांत दोघेचौघे येऊन भेटून आपले तोंडे रूबरू कबूल करून जातात परंतु उगेंच यामात्र म्हटल्यास घरचा प्रकार माणूस संदेह खाऊन लटके तर्ककुतर्क काढून राहातें एकूण सरकार कार्याची निशा यास्तव पुर्ता शोध घेऊन लि।। असे आम्हीं सर्व एक दोन प्रकारचें कालपरवां च लिहून पा। त्या गोष्टी समय पाहून युक्तीने विनंति करून संतोष वाटून उमदे ऐसें च बोलून ठीक करून उत्तर लौकर पाठवणें बहुत काय लिहिणें रा।। छ १९ मोहरम लोभ असा देणें हे विनंति