पत्रांक ५७
पो। छ ८ जिल्काद श्री.
राजश्री मामा स्वामी गोसावी यांसीं व राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसीं
विनंति उपरि अलीकडे फार दिवस आपलें पत्र येऊन वर्तमान कळत नवतें येणेंकरून चित्त सचिंत होतें त्यास आपलीं पत्रें राजश्री मोरोबादादास आलीं त्याजवरून सविस्तर कळोन संतोष जाहाला येथून श्रीमंती लिहिलें आहे त्याप्रमाणें तेथें बोलून जाहालें तरी कार्य ठसवावें श्रीमंताची कृपा तुमचे ठाई चित्तापासून चांगली आहे यात दुसरा प्रकार नाहीं आपण स्वस्त चित्तें असावें राजश्री तात्यास पत्र श्रीमंतांनीं लिहिलें आहे त्याअन्वयें तेथील बंदोबस्त करावा तुम्हीं तो कारस्थानी करणें ते करीत च आहा परंतु क्षणभंगुर मिजाज व सांगणार शिकविणार ते अल्पकोटींतील तेव्हां भरवसा कांहीं एक नाहीं असो ईश्वरी सत्ता कालगत अशी च आहे वरच्यावर पत्रें लिहीत जावी इकडील वर्तमान तर मनोळी हुबळी श्रीमतीं घेतली सावनुराल आले सावनूरकर नबाबांच्या भेटी झाल्या या उपरि हैदरनाइकाकडील प्रकार कसा ईश्वर घडवितो पाहावा येथून वीसा कोसांवर हैदरनाईक झाडीच्या आश्रियानें आहे मीरफैजुल्ला पुढें दोन चार हजार फौज पांच सा हजार प्यादा याप्रो आहे बाहेर मैदानीं येऊन लढेलसें दिसत नाहीं पाहावें कसा विचार होतो होईल वर्तमान लिहून पाठवितों