पत्रांक ५३
श्री.
राजश्री तात्या स्वामी गोसावी यासी
विनंति उपारे कुरणाचे मजकुरविशीं रावसाहेबांस पत्र आम्ही लिहिलें होतें तें तुम्हीं पाहिलें च होतें रावसाहेबानीं उत्तर पाठविलें तें तुम्ही पाहिलें च आहे आम्ही उत्तर पाहून कृतार्थ जाहालों आमचे कुरणासाठीं फारसे गडकरी वोशीत नाहींत चालत च आहे रामचंद्रपंत मामा म्हणाला कीं माझे नावचें पत्र सरकारचें आणवा कीं सूर्यापर्यतचें कुरण व पांगा-याचे सुदामत नानांकडे चालवणें ऐसें पत्र सरकारचें आणून दिल्हें म्हणजे चालेल लढा पडणार ऐसें बोलला त्यावरून श्रीमंतांस पत्र लिहिले त्याचें उत्तर श्रीमंतांनी अशा प्रकारचें लिहिलें की गडकरी यांचे यादींत करार करून दिल्हे आहे हें उचित की काय ही कुरणे पुरातन येक सूर्यापर्यंतचे कैलासवासी तात्याचे वेळेचे पत्रांत सावर्षाचें दुसरें पांगायाचें नानासाहेबी लाकुड फाट्यास दिल्हें ऐशीं दोन कुरणें आहेत जेव्हां कुरणें गेलीं, तेव्हां सासवडी कशी सोय संसाराची पडते उठोन दुसरे जागी जावें हें च मानस यजमानाचे मनांत असलें तरी जिथें सांगतील तेथें राहूं आम्हांस कांहीं लोकांची शेतें जबरदस्तीने पाडून कापून खावंदास न पुसतां रमणे करणें नाहीं असे जे करितात ते खुशाल आहेत असो सारांश रावसाहेबास विनंति करावी की हीं दोन्ही कुरणें नानाचीं नानाकडे चालवणें असें सहजांत स्वामीनीं विसोबास सांगावें व एक पत्र रामचंद्रपंतास द्यावें म्हणजे चालतील गडकरी हि फारसे नानांकडील कामास आग्रह करीत नाहीत त्यामध्यें पुरातन कुरणें कांहीं किल्ल्याकडे नवतीं नानांकडे आहेत कुरणें गेल्यावर नानाची सोय कशी आहे असे बोलावें व तुम्हीं विसोबा तेथे आले आहेत त्यास सांगावें कीं नानाचे दोन्ही कुरणाविशीं मामानीं आम्हीं तुम्हांस सांगितले च आहे व मध्यस्त नवलोजी व कारकून पुण्यात आले होते त्यापाशीं हि सांगितलें च कीं नानाचे कुरणास उपसर्ग लाऊं नये चालतात तशीं चालू द्यावीं तुम्हीं मान्य केलें च आहे बोभाटमात्र येऊ न द्यावा ऐसें सांगितल्यानें हि होईल यांत जे होईल तें करा परंतु कुरणें गेल्यावर येथें राहात नाहीं रावसाहेबाला आमची भीड बरी पडली असो काय बोलावें आम्हास पूर्वी कैलासवासी होते तेव्हां पासून स्वारीस जावयाचें जाहालें म्हणोन एक डेरा राहुटी चार कनाता दोन मंडप शेतखाना देत असत अद्यापि नानासाहेबाचे वेळचे जुने डेरे दोन आहेत गतवर्षी रायानीं लष्करांत दिल्हे ते सामान जुने जाहाले नवे सामान देणें ऐशी विनंति येते समई केली नाना फडणिसास आज्ञा केली कीं काय आहे ते लिहून काढवा तेव्हां नानानीं फरासखान्याचे कारकुनास पुशिलें त्याचे रुमाल गेले आणि म्हणाले की जे समई जें सामान मागत होते तसे श्रीमंत कैलासवासी देवीत होते मोईनसी नाहीं असें म्हणाले त्यास आम्हांस देत गेले आम्ही घेत गेलों जुनीं सामानें हि आहेत असें असतां मोईन कशी नव्हे पाहावी असो आम्हापाशीं सामान नाहीं जुनें सामान आहे त्याजवर चरितार्थ महिनाभर दोन महिने चालेल कनाता चांदव्या शेतखाना अगदीं नाहीं सामान आम्हांस मिळेल तसें द्यावें आम्ही लटकें बोलणार नाहीं असें असतां चार दिवस टाळटाळ करितील रावसाहेब तरी माझे जे चालत आहे ते मी उणे करूं देणार नाहीं सामान माझे द्यावे मी लौकर तयार होऊन लष्करास येईल याप्रमाणे सविस्तर विनंति करावी हें पत्र च दाखवावें वाचावें ऐसी विनंति करावी उत्तर पाठवावें आम्ही उद्यां देवदर्शनास जातो हे विनंति