पत्रांक ५१
श्री
पु।। राजश्री गोविंदपंत तात्या स्वामीचे सेवेसीं
विनंति उपरि हैदरनाइकाकडील करीमखा वकील शिरें घेतले नव्हते त्यापूर्वी वीसबावीस लक्ष दुसाला बोलत होता श्रीमंत दुसाला सत्तर मागत आहेत त्यास तो हैदरनाइकाकडे पाटणास गेला आहे प्रस्तुत शिरे घेतल्यावर पाहावें मालोजी पिसाळ व शिदोजी घोरपडा व हिरासिंग सीख त्रिवर्ग सि-यावर प्रथम दिवशीं गोळ्या लागून ठार जाहाले तुम्ही प्रस्तुत कोठें आहा काय करितां वर्तमान काय तें ल्याहावें हे विनंति