पत्रांक ४९
श्रीशंकर
राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसि
विनंति उपरि तुम्हीं एक दोन पत्रें पा। तीं पावली चावडसेसे होते ती मर्जी अगदी च नाहीं येथें एकप्रकार मजकूर दिसतो असो रिणानबंध प्रमाण परंतु तुमचे आमचे सर्व लक्ष आहे तें रक्षिलें पाहिजे त्या करितां सर्व हि तुम्ही आम्हीं मान अपमान कबूल केला आणि मर्जी रक्षन वर्ततों त्या गोष्टीचें लक्षण चुकावें एकतरेस गेल्यास कार्याची गोष्ट नाहीं तुम्हीं असतां सर्व गोष्टी पल्यावर आणाल या गोष्टीचा पूर्ण भरवंसा, आहे च लाभकाळ असेल त्या च काळीं लाभ होणें तो होईल पर पर्जी कदापि बिघडूं देऊं नये ती गोष्ट जरूर ठीक असावीं त्या प्रा। करून लिहून पा। आम्ही हि तुमचें पत्र आलें म्हणजे येतों दिवसेदिवस ममतावृद्धि होई तो च प्रकार कितेक मनसब्याचे विचारें पाहातां उपयोगी फार लाभ इछावयाचा काल हि नाहीं यास्तव सरकारची चिट्टी जरूर यावी कीं त्रिंबकास येणें या प्रकारें जाल्यास फार उत्तम जशी सोय दिसेल आणि उचित वाटेल तसे लिहून पा। त्याप्रमाणें करूं राजश्री गोविंदराव गोळे लष्करांतून आले हे भेटून सर्व खुलासा सांगतील या गोष्टीस येथील अनुकूलता श्रीमंताकडून आहे ऐसा भाव तेथें लिहून गेल्यास रोगनिर्मूलन होईलसें यांचे बोलण्यावरून वाटतें हे च विस्तारें सांगतील त्याजवरून कळेल यांचें हि साहित्य करावें हे विनंति