पत्रांक २७
श्री वैशाख शु. ९।१७१८(?)
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ ७ जिलकाद पावतें। वर्तमान यथास्थित असे विशेष किल्ले पुरंदर दगा करून जुन्यालोकानीं वैशाख शुद्ध षष्टीस घेतला हवालदार व सरनोबत व येकदोन कारकून वगैरे दहाबारा माणूस किल्यावरील ठार पडलें राजश्री धोंडोबा आप्पाकडील विसाजीपंत कबिलेसुद्धां जुन्यालोकांबराबर वरता गेला यांत काय गारूड आहे हें समजत नाहीं तिकडील वर्तमान विशेष असेल तें जरूर लिहून पाठवावें बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा हे विनंति*