पत्रांक २६
श्री कार्तिक शु।। ६ श. १६९२
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री त्रिंबक रघुनाथ कमाविसदार को तळेगांव ता। पाबळ प्रांत जुन्नर गोसावी यांसि
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार सु।। इहिदे सबैन मया व अलफ कसबें मजकूर येथील कुरण भीमेचे न्याहारचे बचंकुलीसुद्धां राजश्री गोविंद शिवराम यांजकडे गैरसनदी होते म्हणोन पेशजी दूर करून तुम्हांकडे दिल्हें होतें तें हालीं तुम्हांकडून दूर करून मशारनिलेकडे करार करून हे सनद तुम्हांस सादर केली असे तरी सदरहू कुरण मशारनिलेचे स्वाधीन करणे जाणिजे छ ४ रजब आज्ञाप्रमाण