पत्रांक २५
श्री पौष वा। ७ शके १६९९
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान तो मोकदम मौजे पाटेठाण र्ता सांडस प्रांत पुणे सु।। समान सबैन मया व अलफ मौजे मजकूर येथील अंमल राजश्री रामचंद्र नारायण यांजकडे होता तो दूर करून सालमजकुरापासून राजश्री नीलकंठराव गोविंद यांस तैनातेंत करार करून दिल्हा असे तरी मा।रनिले यांस रुजू होऊन अमल सुरळीत देणें जाणिजे छ २० जिल्हेज आज्ञाप्रमाण