पत्रांक २४
श्री
राजश्रीया दस्तक सरकार राजश्री पंतप्रधान तां कमाविसदारांन व चौकीदारान व रहदारान व बाजेलोकान व जकाती मा। निहाय सा। इहिद्दे मया तैन व अलफ राजश्री गोविंदराव नीलकंठ यांचे तेल व तूप जोड्या सुमार २० वीस हरएक जागांतून खरिदी करून पुण्यास आणितील त्यास आणूं देणें जकातीचा तगादा न करणे जाणजे छ १७ मोहरम आज्ञार्थ जाण