पत्रांक २३
श्री पौष वा। १४ शके १६८६
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री परशराम रामचंद्र स्वामी गोसावी यांसि पोष्य माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लिहीत जाणें विशेष मौजे हिपरगें पा। जमखंडी हा गांव तुम्हांकडून दूर करून सालमजकुरापासून राजश्री गोविंद शिवराम यांच्या स्वारास सरंजाम करार करून देऊन हे सनद तुम्हास सादर केली आहे तरी मौजेमजकुर ठाणेंसुद्धां मशारनिलेकडील कमाविसदाराचे हवालीं करून पावल्याचे कबज घेणें जाणिजे छ २१ रजब सु।। खमस सितेन मया व अलफ बहुत काय लिहिणे हे विनंति
बार