पत्रांक २२
पो छ ८ जिल्काद श्रीशंकर
राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पोष्य विश्वासराव त्रिंबक नमस्कार विनंति उपरि श्रीमंत राजश्री रावसाहेबांकडून पत्रें आलीं त्यांत तुमचें नावचीं होतीं तीं व धाकटे नानाचें पत्र पुरवणीसुद्धां येकूण पांच पत्रें तुम्हांकडे पाठविलीं आहेत त्यांची उत्तरें आम्हांकडेस च पाठऊन द्यावीं आमचे लाखोट्यांत च सारीं पत्रें होतीं यास्तव येथें येक च लाखोटा करून सरकारचा खिजमतगार आला आहे त्या समागमें रवाना करूं उत्तर जलदीनें पाठवावें बहुत काय लिहिणें श्रीमंत चावडसेस कधीं येणार तुम्हीं समागमें चे याल किंवा मागाहून येणें होईल हें लिहून पाठवावें हे विनंति