पत्रांक २१
श्रीशंकर
राजश्री गोविंदराव तात्या खामीचे सेवेसी
विनंति उपरि राजश्री गोपाळरावाकडील पत्रें घेऊन जासूदजोडी आली आम्हीं आपलें पत्र घेतलें बाकी सा लाखोटे तुम्हांकडे पा। व जासूदजोडी हि पा। आहे पत्राकरून सर्व मजकूर कळेल तुम्हीं भोजन करून जरूर नाशकास येणें तुम्ही आम्ही बरोबर च येथून चावडसेस जाऊं जातानां काल रामचंद्रपंत गोरे जागा सांगत होते ते हि पाहून जाऊं त्यांस हि बा। जरूर घेऊन यावें माहादाजी गोविंद यांचे पुत्र व भास्करपंत यांस आम्हीं बलाऊ पा। होते त्यास ते प्रातःकाळीं च श्रीमंतांकडे गेले याउपर आम्ही हि भोजन करून चावडसेस येणार तुम्हीं आल्यास तुम्ही आम्ही व रामचंद्रपंत गोरे व मल्हारी ससाणा ऐसे लागली च जागा कोटितीर्थाजवळची हि जातानां पाहून जाऊं म्हणजे लौकर स्थलनिश्चय जाल्यानें सोई पाहून तेथें बंगला वगैरे करणें तें करतील यास्तव रामचंद्रपंतास घेउन तुम्हीं आज उघाड आहे यास्तव जरूर लौकर यावें तुमची मार्गप्रतीक्षा दोनप्रहरपर्यंत करितों तुम्हीं पुढे माणूस पा। तरी आम्ही इकडून येऊं ठिकाणी गाठ पडेल हे विनंति