पत्रांक २०
श्री माघ वा। ६ श. १६९९.
आज्ञापत्र राजश्री पंतप्रधान तां। मोकदम मौजे पाटेठाण र्ता। सांडस प्रांत पुणें सु।। समान सबैन मया व अलफ मौजे मा।र हा गांव सालमजकुरापासून राजश्री नीलकंठराव गोविंद यांस तैनातेंत करार करून दिल्हा असे तरी मा।रनिलेसी रुजू होऊन अंमल सुरळीत देत जाणें जाणिजे
छ १८ मोहरम पा। हुजुर
बार