पत्रांक १५
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान ता। छ ७ रबिलाखर पावेतों यथास्थित असे विशेष तुमचा निरोप घेऊन आलों ते छ २ रबिलाखर पुण्यास येऊन पावलों तुमचें आमचें येते समई कितेक प्रकारें जें खुलासपणाचें बोलणें चालणें जाहालें त्याज प्रमाणें च आम्हाकडे आहे गुता नाहीं त्यास आम्ही येथें आल्यावर एकदोन गोष्टी येथील अविचारी देखिल्या त्या येथें बोलाव्याशा नाहींत परंतु आपणास मात्र सूचनार्थ लिहिलें असे आपण लिहिणें तें परभारें त्यास ल्याहावें आपण बोलल्याप्रमाणें निखालसता चालावी उत्तम आहे आपणापाशी खासगीचे बेहेडयाविशीचे वगैरे कबूल केलें त्याजप्रा।करून देतों आपण तेथील सविस्तर मजकूर वरचेवर लिहून पाठवीत जावा * व श्रीमंत्रास पत्रें लिहिलीं आहेत ही पाहून द्यावयाचीं असतील तीं बाजीपंताकडून देवावीं आपण राजश्री आण्णास लिहित जावें म्हणजे ठीक पडेल नाहींतर मी येथें असतां त्याणीं अविचारीं उगीच मारझोड करावी ते आम्हीं पहावी येणें करून कसें दिसतें यास्तव लिहिलें आहे निरंतर स्नेहवृद्धि करीत जावी लष्करचे कागद गेले किंवा नाहीं हें लिहून पाठवावें बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा हें विनंति आमच्या पत्रांत तुम्हांस श्रीमंतांचे दोन कागद होते ते पाठविले असत हे विनंति तिसरा कागद ऐवजाचे मजकुराचा तो हि पाठविला आहे त्यास नेमणूक ऐवजाची करून बाकी दाहा लक्ष काढली आहे त्याचा तपशील बाजीपंताजवळ आहे तो पाहावा त्या पौ कांहीं ऐवज रावसाहेबाकडे देतील तर पुसावें हे विनंति