पत्रांक १०
श्री रविवार श्रावण शु० १।१६८६
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी तो बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपर येथील कुशल ता। छ २९ मोहरम पावेतों वर्तमान यथास्थित असे विशेष आपण पत्र पाठविलें तें पावलें श्रीमंताचें पत्र लष्करांतून आलें त्याप्रमाणें करावें परंतु विचार पाहतां यांचा कारभार विल्हेस लागला त्या हि मध्यें राजश्री नारो बाबाजी सारख्यास तशा च पर्यायें सांगितल्या सतीस चाळीस हजार जाजती हि निदानी देतील परंतु त्याचें फाजील फार आहे हें निमित्य ठेऊन स्थल हातीं देणार नाहीं व त्यांस पिछा हि बळकट मग कोठें पुसावें आधीं जीं जीं खुळें माजलीं आहेत त्यांचा कोठें परिणाम मग हें त्यांत अधिक वाढवावेंसे होतें असें मला दिसतें तुम्हीं दूरंदेशी मनांत आणून कसे करावें हें लिहून पाठवावें व श्रीमंतीस कोठें ल्याहावें हें हि लिहून पाठवावें पैठणचे कमाविसदार हिशेब घेऊन आले आहेत चिंतो विठ्ठल यासी बोलावेंसें म्हणतात परंतु आपण मला सांगितले होतें यास्तव टाळाटाळ केली पुढें काय तें लिहून पाठवावें चिंतोपत सातारकर तेथें गेलियावर कोठें मर्जी जाली येथें येण्याचा प्रकार कोठें तें हि थोडेसे लिहून पाठवावें आम्हांस रसदेचे तरतुजेविशी बोलाविलें होतें तें कार्य जाहालें कोकण व महिपतराव कवडे व किरकोळ कोठें कांहीं या प्रा। मात्र राहिलें पुढें निरोप हि लवकर देवावा लस्करच्या वराता फार येतात श्रीमंताचें जाणें नगरावरून लवकर होतें म्हणजे फार चांगली गोष्ट होती तोफखाना लटका खर्च असा प्रकार आहे या खर्चाचे मोबदला फौज पांचसात हजार लौकर जमा करून भाद्रपदांत नगरचे पलीकडे जावें हें बरें आहे तुमचा उपाय काय जितका चालेल तितका कराल परंतु गांठ कठिण पडली यामुळें उपाय नाहीं बहुत काय लिहिणें लोभ असा दीजे हे विनंति