पत्रांक ७
श्री.
चिरंजीव राजश्री नीलकंठ १महादेव यासि प्रति माधवराव बल्लाळ प्रधान आशिर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें विशेष सरकारचा जामदारखाना व कागदपत्र व जामदार पुरंधरी आहेत त्यास तो जामदारखाना हालीं पुणियांस आणावा लागतो याजकरितां हें पत्र तुम्हांस लिहिलें असे तरी लिहिल्याप्रमाणें जामदारखाना व कागदाचे रुमाल व जामदार ऐसे पुण्यांस पाठऊन देणें रा छ २ रमजान सरकारचे दागिने रिझेचे आहेत ते सरकारांत पाठवणें हे आशिर्वाद