Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक ९५.
१७६८ ता. २९ एप्रील श्री. १६९० वैशाख शुद्ध १३
राजश्रिया विराजीत राजमान्य राजश्री सखाराम भगवंत व गोविंद सिवराम स्वामी गोसावी यांसिः-
पो रघुनाथ बाजीराव नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. अनूबाई कुलकर्णी मौजे सिनवली तो घोडें पो जुनर इनें हुजुर विदित केले की, “आपले सासरे त्रिंबक कृष्ण व चुलत सासरे नानाजी कृष्ण या उभयताचें मौजे मारचें कुळकर्ण निमेनीम आहे. त्यास नानाजी कुलकर्णी मखमल अलमाचे (?) कैदेंत पडल्यावरी त्रिंबक कुलकर्णी यांणीं. मोरो गोपाळ गोळे याचे तीनशें स्त्रो कर्ज घेऊन नानाजी कुलकर्णी यास सोडून आणिलें. त्यापैकीं गोळ्यांस दोनशें स्त्रो कमजादा दिल्हे. बाकी शंभर रुपये अजमासें देणे राहिले आहेत. त्यास गोळ्यांनीं व्याजाचे व्याज करून शंभर रुपयांचे पंधराशें स्त्रो केले आहेत. आणि नानाजी कुलकर्णी याच्या पुत्रास नेऊन मौजे मारचे कुलकर्ण कर्जात लेहून घेतलें आहे. ऐशास नानाजी कुलकर्णी याच्या लेकानीं आपले वाटणीचे कुळकर्ण द्यावें. माझे वाटणीचें कुलकर्ण द्यावयास अधिकार नाहीं व आपल्यावरी बहुतांचे कर्ज आहे. त्यास सर्वास दामाशाईप्रों ऐवज वतनाचे विक्रयाचा येईल तो देऊन फडशा करावा व मी जीवंत आहे तों माझे अन्नवस्त्राची बेगमी करुन वतन घेणें तरी घ्यावें. तें न करितां जबरदस्तीनें वतन घेतलें त्याजमुळें दुसरे कर्जदार तगादे करितात व पोटास अन्नवस्त्र नाहीं. याजकरितां माझा वांटा कुलकर्णाचा मजकडे चालता करून कागदपत्र लेहून घेतले आहेत, ते माघारे देवावयाची आज्ञा करावी." म्हणोन. त्याजवरून हें पत्र तुम्हांस लिहिलें असे. तरी सदरहू वर्तमान तुम्हीं वाजवीचे रीतीनें मनास आणून विल्हें लावणें. जाणिजे. छ ११ जिल्हेज सु।। समान सितैन मया व अलफ, बहुत काय लिहिणें? हे विनंति.