Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री मार्तंड भैरव.

लेखांक ८८.

१६९४ आषाढ वद्य ७.

श्रीमत् राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक भगवंतराऊ शंकर कृतानेक सां । नमस्कार विज्ञापना. भवानी नाईक राक्षे श्रीगोंदकर व गोपाळ नाईक राक्षे या उभयतांच्या भाऊपणाच्या वांटियाचा कजिया आहे. त्यास, भवानी नाईक यांस आम्ही जामीन जालों. मुदतीस न आला सबब त्याचें कर्ज मातुश्री सकुबाई सिंदे याजकडे आहे. रुपये ४०००० चाळीस हजार आहे. तो ऐवज उभयतांचा कजिया विल्हेस लागेतों. नाईकमजकूर यांस ऐवज देणार नाहीं. स्वामीची आज्ञा येईल तेव्हां देऊं. ज्यास ऐवज देवाल त्यास देऊं. मित्ती शके १६९४ नंदननाम संवत्सरे, आषाढ वद्य ७ सप्तमी. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.