श्री.
लेखांक २१४.
१७०० माघ वद्य ७.
(श्रीसांब : सपुत्रो विजयते राजा शाहुनरपति हर्षनीधान रघुनाथ बाजीराव मुख्य प्रधान.)
राजमान्य राजश्री चिमणाजी गोपाळ व सदाशिव धोंडदेव व त्रिंबक पांडुरंग व भास्कर भिमाजी यांसि :-
रघुनाथ बाजीराव प्रधान. सु॥ तिसा सबैन मया व अलफ. सरकारचे मामलेदार कोकणांत होते ते मुंबईस गेले. त्यास, अलाहिदा हिशेब तुम्हास समजावणें ह्मणोन ताकीदपत्रें पाठविलीं आहेत. ही त्यास देऊन, वाजवीच्या रीतीनें त्याचा हिसेब पाहून; लौकर त्यास हुजूर रवाना करणें. जाणिजे. छ १९ मोहरम.
(लेखनावधि:)