श्री.
लेखांक २१०. (अ)
१७०० पौष.
यादी मुंबई येथील अनुष्ठानाची वगैरे नेमणूक दरमहा. सु॥ तिसा सबैन रुपये.
१२ भोजनखर्च आसामी.
४ सदाशिव धोंडदेव.
४ पाणक्या.
४ देवाचा नैवेद्य.
-----
१२
१५ बागास कामगार आसामी ५ दर आसामीस रुपये ३ प्रमाणें.
२० चौकीदार आसामी ५ दर आसामीस रुपये ४ प्रमाणें.
४० कारकून आसामी २.
२५ त्रिंबक पांडुरंग.
१५ सदाशिव धोंडदेव.
------
४०
५ देवाचे पुजेस ब्राह्मण. त्यास दक्षणा रुपये.
४ पाणक्या ब्राह्मण यास दरमहा रोजमुरा रुपये.
-----
९६
येकूण शहाण्णव रुपये दरमहा खर्चास नेमणूक येणेंप्रमाणें करार.