श्री.
लेखांक १३६.
१६९७ फाल्गुन वद्य ३.
पु॥ राजश्री लक्ष्मण आपाजी गोसावी यांसि :-
सु॥ सीत सबैन मया व अलफ. मसलत लांबणीस पडली. खर्चास तोड नाहीं. याजकरितां इंग्रेजी सरंजाम सोडून, फितुरियांवरी चालून जाऊन, लडाई करावी, श्रींने दौलत दिल्ही आहे तरी त्यास मारून घेऊन, नाहीं तर होणार तें होईल, ऐसें योजिलें होतें. परंतु, तातड न करावी, दोन लाख रुपये कर्ज देतों, म्हणून कारनेल हो बोलिले. त्याउपरी गाहाणवट द्यावें, याप्रों दिक्कत घातली. सरकारांत गहाण ठेवावयास कांहीं नाहीं. हे जाबसाल करतां आठ च्यार रोज गेले. तों धौशा येऊन मिळाला. ते सबळ जाले. याजकरितां तोहि प्रकार राहिला. हालीं मसलत कांहीं सुचत नाहीं. तेविसींचे प्रकार अलाहिदापत्रीं विस्तारें लिहिलें आहेत. कळतील. ऐशीं हजार जनरालानींहैदरनाईकाचे ऐवजीं देविले. त्याप्रों पन्नास आले. तीसहि आल्यादाखल. परंतु वोढ
भारी. रोजमरादेखील जाहला नाहीं. कोठपर्यंत ल्याहावें ? जाणिजे. छ १७ मोहरम.
(लेखनावधि:)
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57