श्री.
लेखांक ३१.
१७०३ श्रावण वद्य ११.
नवाब नजबखान बाहादूर हे हालीं याप्रमाणें कौल लिहून देऊं ह्मणतात, त्याची नकल :-
१ मेरट वगैरे महाल व इटावा वगैरे माहाल व कडाकुरा कदीम पातशाही भोजनखर्च व तोफखाना वगैरेचा तनखा आहे तें बदस्तूर आम्हांकडे असावें.
१ बंगाला वगैरे मुलूक कदीम पातशाही आहेत. दुशमनाकडून काढून बदस्तूर आम्हाकडे असावा.
१ सहारणपूर वगैरे मुलूक बदस्तूर आम्हाकडे असावा.
१ सिपारस जाटाची न करावी.
१ सुबे इलाहाबाद आमचा आहे तो बदस्तूर आम्हाकडे असावा.
१ नबाब वजिरांनीं मुलूक हालीं घेतला आहे व कदीम आहे तो नबाब वजिराकडे असावा.
१ अहमदखान बंगश याचा मुलूक वजिरांनीं घेतला आहे. बंगश माराचा पुत्र चाकरीस हजर जहालियासी पातशाही बंदा आहे. वजिराची खातरदास्त त्याचा प्रांत सोडावा.
१ शिखांकडील मुलूख आमचा व तुमचा फौजेचे इतफाकानें हस्तगत होईल त्यांत निम्मे हिस्सा वांटून घेऊं.
१ ग्वालेरचा मुलूक इंग्रजांनीं घेतला आहे. त्यास, ग्वालेर किल्ला पातशाही आहे. तो बदस्तूर पेषकेष हजूरची करावी.
१ राजे जैपूर व राजे मारवाड कदीम बंदे पातशाही आहेत. हाली हजूर चाकरीस हजीर जाहालियासी आपले कदीम मुलकावर सरफराज राहातील. जर बागी होतील तर त्यांची तंबी करूं. जैरपूरचा मामला आह्मांकडे असावा व मारवाडचा मामला आपणांकडे असावा.
१ इंग्रजांनीं दक्षणचा मुलूक हालीं घेतला आहे व कदीम आहे त्यांत निम्मे वांटून घ्यावा. श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबांचे खातरदास्त सुभेदारी श्रीमंत पंतप्रधानसाहेबाची असावी.
१ सुभे अजमेर आपणांकडे असावा.
१ जो तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू, त्याची तंबी करावयासी अंतर करूं तर शफत असे.
१ राजे गोहदकडील व आणिक तिकडील मुलूक तरवारेचे जोरानें हस्तगत होईल. जर तिकडील राजे हजर जहालियासी मामला आह्मांकडे असावा. बागी जहालियास तंबी करून निम्मे मुलूक वांटून घेऊं. उमराव राजे तालुक्यांत शाहाचे बंदर्गीत हजर होतील, त्यांसी न बोलावें व अमुल हुकमी केलियास त्यांचे तंबीस शामील राहूं.
१ मुलुख कालपी व झांसी आपणाकडे असावे.
१ कोणी आमचा चाकर उठोन तुह्मांकडे जाईल त्यास तुह्मी चाकर न ठेवावा व तुमचा चाकर आह्मांकडे येईल तरी आह्मी चाकर ठेवणार नाहीं.
१ तूर्त तुह्मांस मोहीम रुबकर आहे. त्यास, हुजूरचे फौजा व खर्चास तुह्मीं द्यावें. पुढें हे करार असे कीं, आमची फौज तुमचे कुमकेस जाईल तरी तुह्मीं खर्चास द्यावें. तुमची फौज आमचे कुमकेस आली तर आह्मी खर्चास द्यावें.
छ २३ जमादिलाखर संवत् १८३८ सन २२ पातशाही.