लेखांक ३२
श्री.
१६५५ पौष शुध्द ७. श्रीराजाशाहूस्वामीचरणी तत्पर बाबूराव दाभाडे सेना खासखेल निरंतर.
आज्ञापत्र सेना-धुरंधर विश्र्वासनिधि राजमान्य राजश्री बाबूराऊ दाभाडे सेनाखासखेल ता|| मोकदम-
मौजे केळगांव, ता|| चाकण सु.|| अर्बा सलासीन मया व अलफ. मौजे मजकूर दरोबस्त मोकासा राजश्री पांडुरंगाश्रमबाबा, वास्तव्य अळंकापुरी, यांस वर्षासनांत दिल्हा आहे. तरी, मौजेमजकूरचा आकार होईल तो मोकासबाबेचा ऐवज यांजकडे पावीत जाणे. प्रतिवर्षी नूतन सनदेचा उजूर करीत * नव जाणे. जाणिजे. र|| छ ६ माहे साबान. (विलसति लेखनावधी मुद्रा.)
बार
लेखांक ३३.
श्री.
१६५५ पौष वद्य १२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६० प्रमादी संवत्सरे पौष बहुल द्वादशी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शाहूछत्रपती स्वामी यांनी समस्त राजकार्यधुरंधर विश्र्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसी जे- श्रीपांडुरंगाश्रम परमहंस वास्तव्य मौजे आळंदी ता चाकण प्रा जुन्नर हे थोर महापुरुष, यांचे मठचा योगक्षेम चालविलिया श्रेयस्कर जाणून, मौजे केळगांव ता मजकूर हा गांव पेसजीच्या मुकसियाकडून दूर करून, हाली यास कुलबाब कुलकानू देखील हालीपट्टी व पेस्तरपट्टी खेरीज हकदार व इनामदार करून, नूतन इनाम दिल्हा असे. तरी तुम्ही मौजेमजकूर यांचे दुमाला करवून यांस व यांचे शिष्यपरंपरेने इनाम चालवणे. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रती लेहून घेऊन अस्सल पत्र भोगवटियास परतोन देणे. जाणिजे. बहुत काय लिहिणेॽ * तरी सूज्ञ असा.