लेखांक ६.
श्री.
शिक्का.

१६१९ भाद्रपद शु||१३. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २३ धातृनामे संवत्सरे भाद्रपद शु || १३ रविवासरे ते दिवशी क्षत्रियकुलावतंस श्रीराजाराम छत्रपति यांणी राजश्री देशाधिकारी व लेखक, (शिक्का) प्रांत चेऊल, यांसी आज्ञा केली ऐसीजे- राजश्री महादाजी कृष्ण सभासद यास स्वामीने कृपाळू होऊन मौजे खवली ता||पाली, प्रां||म||र, हा गांव इनाम देऊन सनद पूर्वी सादर केली. तेणेप्रमाणे चालत असतां, त्या गांवास कितेक उपद्रव लागतो, म्हणून विदित झाले. त्यावरून तुम्हांस हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी तुम्ही त्या गांवास कोणाचा उपद्रव लागो न देणे. म||रनिल्हे स्वामीचे येकनिष्ठ सेवक, यांचे चालवणे स्वामीस अगत्य आहे. या कारणे मौजेम||र यांस बिलाकसूर इनाम चाले, ऐसे करणे. जाणिजे. निदेश समक्ष. मोर्तब.
सुरुसूद.


लेखांक ७
श्री.


१६२३ वैशाख शु|| ९. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २७ वृषनाम संवत्सरे वैशाख शुध्द ९ इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति यांणी राजश्री देशाधिकारी, प्रां| चेऊल, यांसी आज्ञा केली ऐसीजे- राजश्री महादाजी कृष्ण यास मौजे खवली, त|| पाली, प्रां मजकूर, हा गांव कैलासवासी स्वामीने इनाम दिल्हा आहे. ऐसियास, म|| रनिल्हे स्वामीचे येकनिष्ठ सेवक, याकरितां स्वामीने हा करार केला असे. तरी, तुम्ही मौजे मजकूर यासी बिलाकसूर इनाम चालवणे आणि तेथील उत्पन्न यासी पावे ऐसे करणे. कथळा कसूर कांही न करणे. जाणिजे. पेशजी भोगवटा चालल्याप्रो चालवणे. निदेश समक्ष.