लेखांक ४.
श्री राजाराम नरपति हर्षनि. मोरेश्र्वरसुत निळकंठ मु. प्र.
श्री.
१६१८ पौष व ||२. स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २२ युवनाम संवत्सरे पौष्य बहुल द्वितीया मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजारामम छत्रपति यांणी राजश्री भीऊजी गुजर मुद्रधारी व कारकून जंजिरे कुलाबी यांसी आज्ञा केली ऐसीजे- रो महादाजी कृष्ण राजश्री शंकराजी पंडित सचिव यांकडे आहेत. त्यास मौजे खाविली, ता. पाली, हा गांव स्वामीने इनाम दिल्हा आहे. तेथे तुम्ही लोक पाठवून उपसर्ग देतां, इनाम सुरक्षित चालो देत नाही, म्हणून विदित जाले. तर स्वामीने मारनिल्हेस मौ|| मार इनाम दिल्हा असतां तुम्हांस तेथे उपसर्ग द्यावयास गरज कायॽ याउपरी ऐसे करीत न जाणे. मारी लोक पाठवून उपसर्ग देत न आणि इनाम सुरक्षित चाले, ऐसे करणे. जाणिजे. निदेश समक्ष.
मर्यादेयं विराजते.
रुजू
सुरुसूद.
लेखांक ५.
श्री.
१६१९ भाद्रपद शु||१३.
शिक्का.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २३ धातृनामे संवत्सरे भाद्रपद शु|| त्रयोदसी रविवासरे क्षत्रियकुलावतंस, श्रीराजाराम छत्रपति यांणी राजश्री भिऊजी गुजर मुद्राधारी जंजिरे कुलाबा यांसी आज्ञा केली ऐसीजे-राजश्री महादाजी कृष्ण सभासद यास मौजे खवली, ता| पाली, प्रांत चेऊल, हा गांव पूर्वी इनाम करून देऊन सनद सादर केली आहे. ऐसे असता, तुम्ही त्या गावाला उपद्रव देतां, वसूल घेऊन गांवही खराबा केला, हे वर्तमान हुजूर विदित जाले. तरी म|| रानिल्हे स्वामीचे एकनिष्ठ सेवक, सेवाही एकचित्ते करीत आहे, त्याचे चालवणे स्वामीस अगत्य, याकरितां यास स्वामीने इनामगांव दिल्हा, त्या गांवास तुम्ही उपद्रव देऊन वसूल घ्यावा हे कांही बरे नव्हे. याउपरी हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी, तुम्ही त्या गावाचे वाटे न जाणे. आणि मौजेम || र मारनिल्हेस इनाम सुरक्षित चाले, ऐसे करणे. त्या गांवापैं|| जो काय तुम्ही वसूल घेतला असेल, तो परतोन देणे; उजूर न लावणे. येविसी राजश्री चिमणाजी आऊजी यांस लिहिले आहे. तेही तुम्हांस आज्ञा करितील. जाणिजे. निदेश समक्ष. सुरुसूद.