Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ३८८
श्री.( नकल.) १७१७ आश्विन शुद्ध १
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजी गोविंद स्वामी गोसावीः-
पो माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहणे. विशेष. तीर्थस्वरुप कैलासवासी नानासाहेब यांणीं संस्थान गढेमंडळेपैकीं रेवादक्षणतीरचे सोळा माहाल कैलासवासी रघोजी भोंसले यांस करार करून दिल्हे होते. परंतु भोंसले यांचा अमल महालीं दखल जाला नाहीं. त्यास, हालीं राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब यांणीं पुण्याचे मुक्कामीं येऊन व दक्षणतीरचे महालांविसीं रजबद्दल केली. त्यास मशारनिले सरकारलक्षाप्रमाणें चालतात. सबब त्यास सरकारांतून रेवादक्षणतीरपैकीं, खेरीज चौरागड करून, कमाल आकाराचे माहाल रु।। ४००००० च्यार लक्ष रुपयांचे द्यावयाचा करार ठहरला. ते महाल दक्षणतीरचे बीतपशील.
१ पा। बचई.
१ पा। बिछिया तालुके दोन.
१ पा बर्गी तालुके आठ.
१ पा। भोवरगड तालुके तीन.
१ पा सायपूर चव-यागड तालुके सात.
१ पा। खांडेबान्हे तालुके नव.
१ पा। कठोठिया.
१ पा पलाहो.
१ पा। देवरधा.
१ ता। मुकुंदपूर,
१ पा। संभलपुर.
१ पा रामगर.
-----
१२
एकूण बारा माहालपैकीं सरकार अमल ज्या माहालीं असेल त्यापैकीं किल्ले चौरागडच्या खर्चाबद्दल रुपये ५०००० पंनास हजार रुपयांचे माहाल व गांव किल्ल्या लगत असतील ते सरकारांत किल्ल्याचे खर्चास ठेऊन, बाकी सरकारअमली माहाल सेनासाहेबसुभा यांजकडे सदरहू चार लक्षांचे यावयाचे करार करून, ते सनद तुह्मांस सादर केली आहे. तरी मशारनिलेचे दुमाला करणें. चार लक्षांचे बेरजेहून अधीक बेरीज सरकारअमली माहाली जालियास, त्याचे माहाल सरकारांत ठेवणें, च्यार लक्षांचे भरतसि अमलीं माहालपैकीं बेरीज कमी आलियास, गैरअमली माहाल आहेत त्यापैकीं भरतीस कमाल आकाराचे बेरजेचा माहाल लावून देणें. जाणिजे. छ २९ रा। वल, सुसीत तीसैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.